Fear of Konkan approaching Mumbai kokan marathi news 
कोकण

कोकणवासीयांना धास्ती मुंबईकर गावाकडे येण्याची .....

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : केंद्र शासनाने जाहीर केलेला लॉकडाउन संपण्यासाठी चार दिवस राहिले आहेत. त्यामुळे लॉकडाउन वाढणार की शिथिल होणार याबत अद्याप संभ्रम आहे. परंतू लॉकडाउन शिथिल झाल्यास रोजगारनिमित मुंबई, पुणे येथे असणारे तालुकवासीय आपल्या कुटुंबासमवेत गावाकडे धाव घेण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. तसे झाले तर हजारोंच्या संख्येने चाकरमानी गावाकडे वळणार असल्याने ग्राम कृतीदलाने दक्ष राहण्यासंदर्भातील सूचना ग्राम समितीचे अध्यक्ष सरपंच यांना प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. तालुक्यात ४९ ग्रामपंचायती असून त्यात १०९ गावे व २३२ वाड्यांचा समावेश आहे.

 राज्याने लॉकडाउन घोषित केल्यानंतर काही मुंबईकर गावाकडे परतले. त्यांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. त्यानंतर केंद्राने देशात लॉकडाउन केल्यानंतर अजून काही चाकरमानी आपापल्या गावाकडे आले. अजूनही काही नागरिक दोनशे किमीचा प्रवास पायी चालत करीत गावाकडे येत आहेत. तालुक्यात आतापर्यंत सुमारे ४ हजार ४८१ नागरिक आले आहेत. १ एप्रिलनंतर चालत आलेल्या १०९ नागरिकांना तालुक्याच्या सीमेवर ताब्यात घेत त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले.

तर गावांची सुरक्षा ग्राम कृतीदलाकडे

त्यातील ३१ दापोली येथील नागरिकांना मंडणगडमधून दापोलीत पाठवत त्याठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले. तर अन्य नागरिकांना तपासणी नंतर होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मंडणगड विलगिकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या उर्वरित १३ नागरिकांना पूर्ण तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार काही दिवसांनी होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अजूनही त्यातील निम्यांची क्वारंटाईन मुदत संपायची बाकी आहे. तर विदेशातून आलेल्या ४६ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील निम्म्याहून अधिक नागरिकांची क्वारंटाईन मुदत संपली आहे. तरीसुद्धा त्यांना सूचना देवून घराबाहेर पडू नये असे बजावण्यात आले आहे.

त्यावर आरोग्य विभाग नजर ठेवुन आहे. दरम्यान १४ एप्रिल नंतर लॉकडाउन शिथिल झाल्यास मुंबईतील तालुक्यातील चाकरमानी गावाकडे धाव घेण्याची शक्यता आहे. तालुक्यात सुदैवाने एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. आता कोरोना आला तर तो बाहेरून येणाऱ्या व्यक्तिद्वारेच येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्याच्या प्रवेशद्वारावरच त्यांना ताब्यात घेण्याची मोहीम ता. १ एप्रिल पासून राबविली आहे. तसेच नजर चुकवत जर कोणी गावात आलाच तर ग्राम कृतीदलाला सतर्क राहण्याच्या सूचना करीत माहिती कळविण्यास सांगण्यात आले आहे.

ग्राम कृतीदल समितीची लागणार कसोटी
लॉकडाउन नंतर मुंबईतील नोकरदारवर्ग गावाकडे परतल्यास त्यांना घराऐवजी बाहेरच क्वारंटाईन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्राम कृतीदलात समावेश असणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, तलाठी, आशा सेविका, पोलीस पाटील, शाळांचे मुख्याध्यापक यांनी दक्ष राहत आपल्या गावाची काळजी घ्यावी. तसेच गावातील घडणाऱ्या घडामोडी त्वरित प्रशासनास कळवाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य सेवक, तलाठी फिरकत नसल्याने नाराजी
कोरोनाने जगात थैमान घातले असताना आता त्याचा गावात शिरकाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणारे आरोग्य सेवक व तलाठी प्रशासनातील महत्वाचा घटक आहेत. त्यांचा ग्राम कृतीदलात समावेश करण्यात आला आहे. मात्र अपवाद सोडल्यास काही आरोग्य सेवक व तलाठी गावांत जावून नागरिकांना भेटत नसल्याच्या तक्रारीचा सूर आळविला जावू लागला आहे. यात अतिरिक्त प्रभार म्हणून गावे असणारे आरोग्य सेवक बोलवून सुद्धा गावांत जात नसल्याने त्यांच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

UPSC Success Story : ग्रामीण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी डॉ.भगवंत पवार यांचे UPSC CMS मध्ये ऑल इंडिया 25वी रँक!

Pune Digital Arrest : डेक्कनमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक; ७९ वर्षीय महिलेची १७ लाखांची आर्थिक हानी!

Pune Domestic Violence : हडपसर मधील घरगुती हिंसा; दोरी आणि लोखंडी गजाने पत्नीला मारण्याचा प्रयत्न!

Pune Cyber Scam : सायबर गुन्हेगारांनी पोलिस असल्याचा भास करून ज्येष्ठ नागरिकाला फसवले; बँक खात्यातून ३६ लाख रुपयांचा गंडा!

SCROLL FOR NEXT